ब्रेकिंग

चांगले शिक्षण गरीबी दूर करते .. प्रशांत गांधले , सह आयकर आयुक्त , पुणे .

          संपादक – प्रा सोमनाथ गोडसे .                                                    

कर्जत  – आपल्या मुलांचा कल व आवड लक्षात घेऊन त्यामध्ये त्यांना करिअर करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे . आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले तर ते निश्चित गरीबी दूर करू शकतात .असे मत आयकर विभाग पुण्याचे सह आयुक्त प्रशांत गांधले यांनी भांबोरा येथे सत्कारप्रसंगी व्यक्त केले . त्यांची नुकतीच केंद्र सरकारच्या आयकर विभागात सह आयुक्त म्हणून पुणे येथे  पदोन्नती झाली . त्या निमित्त भांबोरा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते .

  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब लोंढे होते . या सत्कार प्रसंगी  सागर लोंढे , राजेंद्र लोंढे ,डॉ.अरुण लोंढे , प्रमोद शेळके ,प्रा.सोमनाथ गोडसे , रोहिदास परकाळे सर , यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमासाठी माणिकराव लोंढे , गणपत लोंढे , महादेव जांभळे साहेब ,संजय होलम , कैलास लोंढे , शिवाजी लोंढे ,दिपक लोंढे , शरद लोंढे, सचिन जगताप , शैलेश पाटील , संतोष रणदिवे , रुपेश लोंढे , ओम गोसावी , व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे संपर्क करा