ब्रेकिंग

सुपेकर विदयालयातील ‘ शिक्षकांना ‘ ड्रेसकोड .. तालुक्यातील पहिलाच निर्णय !

   संपादक – प्रा सोमनाथ गोडसे .                 

कर्जत –  विद्यार्थ्यांना जसा शाळेचा गणवेश अनिवार्य असतो त्याप्रमाणे  आता राज्यातील सर्व शिक्षकांनाही ड्रेसकोड असणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती परंतु या निर्णया च्या विरोधात व बाजुने अनेक मते आली परंतु अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाले . या निर्णया नुसार दुधोडी (ता कर्जत ) येथील कै . सुधाकर दत्तात्रय सुपेकर विद्यालयाने शासन निर्णयाची अंमलबजावणी करून आपल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना  ड्रेसकोड लागू केला आहे . या निर्णयाचे सर्व पालक व ग्रामस्था मधून कौतुक होत आहे .
या निर्णयावर बोलताना मुख्याध्यापक रामराव भोसले म्हणाले , शिक्षक हे भावी पिढी घडवत असतात. तसेच, जनमानसात त्यांच्याकडे गुरु म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असतो. ही बाब विचारात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे .
हा निर्णय घेताना शिक्षण विभागाने काय म्हटलंय?
 शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरुक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरुप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वावर तसेच, त्यांचेसमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांचेवर होत असतो. ही बाब विचारात घेता, राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा, याबाबत शिक्षण विभागाने सूचना जारी केल्या आहेत.
१) सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.
२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा , जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पँट, शर्ट इन करून परिधान केलेला असावा. गडद रंर्गाचे वा चित्र विचित्र नक्षीकाम असलेले शर्ट परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स टी शर्टचा वापर करू नये.
३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी
४) शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा.
५) पुरुष व महिला शिक्षकांकरीता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे.
६) पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा.
७) महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे (उदा. पुरुषांनी शूज) यांचा वापर करावा.
८) स्काऊट गाईड च्या शिक्षकांना स्काऊट गाईडचेच ड्रेस राहतील.
९) वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना/महिला शिक्षकांना बूट (शूज) वापरण्यातून सवलत देण्यात आली आहे .
शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी फक्त शिक्षण विभागापुरीच मर्यादित न ठेवता प्रशासनातील प्रत्येक शासकिय विभागाला लागू केली पाहिजे .
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे संपर्क करा