ब्रेकिंग

भांबोरा – हिंगणगाव सेवा सोसायटी देणार १३ टक्के लाभांश – नितीन पाटील

संपादक – प्रा. सोमनाथ गोडसे .                    [ 9730679801 ] 

कर्जत –  भांबोरा -हिंगणगाव सेवा सोसायटी सर्व सभासदांना १३ टक्के लाभांश देणार आहे . अशी घोषणा वार्षिक सभासद मिटिंग मध्ये अध्यक्ष नितीन पाटील यांनी केली . यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली . यावेळी वार्षिक अहवालाचे वाचन सचिव निखिल काळे यांनी केले .

यावेळी बोलताना संचालक महादेव जांभळे म्हणाले , संस्थेला ऑडीट वर्ग ‘अ ‘ मिळाला आहे . येणाऱ्या काळात संस्थेचे भाग भांडवल वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व सभासदांनी वसुलीसाठी सहकार्य करावे जेणेकरून पुढील वर्षी जास्त लाभांश देता येईल . .यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामदास रणदिवे, संचालक डॉ. अरूण लोंढे , बाळासाहेब होलम , भिमराव लोंढे , अशोक चव्हाण , अमृत कोरे , शिवाजी शेटे , रामचंद्र पुंडे , यशवंत चव्हाण , तज्ञ संचालक प्रा .सोमनाथ गोडसे , रणजीत राजेभोसले , जेष्ठ सभासद रावसाहेब लोंढे , अंकुश जगताप , शिवाजी लोढें  , संजय होलम ,शिवाजी रणदिवे , प्रकाश लोंढे , तंटामुक्तीचे अध्यक्ष शरद लोंढे , उपाध्यक्ष प्रमोद शेळके , संतोष रणदिवे  व मोठया संख्येने सभासद हजर होते .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे संपर्क करा